* नवापूर काँग्रेस कमेटीचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
* मृतांचा नातेवाईकांना आर्थिक मदत
नवापूर । शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या रंगावली नदीच्या महापुरामुळे नष्ट झालेल्या पुनर्वसनासाठी नवापूर नगर पालिकेचा नगराध्यक्षा व नगरसेवकांनी भुखंड मंजुरी मागणी जिल्हाधिकारी यांचाकडे केली आहे, तर शासनातर्फे मृतांचा नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. तर नवापूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करुन तात्काळ मदत मिळावी अशी मागणी नवापूर तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष भरत गावीत यांनी जिल्हाधिकारी यांचाकडे केली आहे.
सध्या रंगावली नदी नुकसान झालेल्या तर काही लोक आपले पुनर्वसन व्हावे यासाठी काम सुरु करत आहे.नगर पालिके मार्फेत साफसफाई करण्याचे काम सुरु आहे. वर्दळ असलेला रंगावली किनारा महापुरा नंतर स्मशान शांततेत भग्न अवस्थेत दिसत असुन आता फक्त आठवणी राहील्या आहेत. नुकसान भरपाई व पुनर्वसनासाठी राजकीय नेत्यांची निवेदने सुरु असुन जिल्हाची शासकीय यंत्रणा नवापूर व विसरवाडी भागात फिरत आहे.जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नागझरी डॅम, रस्ते, रंगावली परिसर, शेती, पीके, घरांचा नुकसानीची पुन्हा पाहणी केली. महापुर व अतिवृष्टाचा फटक्याने अनेकांची संसार उध्वस्त केले आहेत. त्यामुळे त्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला. शांत झालेली रंगावलीचे पाणी ओसरुन कचरा, घाण, चिखल, पडलेले घरे, त्याचे अवशेष, मेलेली जनावरे अशा अवस्थेत दिसत आहे.
अनेकांचे संसार उद्धवस्त; 10 कोटीचे नुकसान
महापुरात अनेक किंमती वस्तु वाहुन आल्या असुन रंगावली नदीचे पाणी ओसरल्यावर त्यातील वस्तु,लाकुड घेऊन जाण्याची स्पर्धा लागली आहे.अनेक वस्तुंची चोरी झाली असुन भंगार चोरुन घेऊन जात आहे. काहींना वस्तु मिळाली तर ती परत देण्यावरुन भांडणे ही होत आहेत. नवापूरातील महाप्रलयाने 419 घरांची हानी झाली असुन अतिवृष्टी व महापुरामुळे 10 कोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अनेकांची घरे नष्ट होऊन जागा भुईसपाट झाली असुन कुंटबीयांकडे काहीच शिल्लक राहीलेली नाही.आज त्यांना निवासाची जागा नसल्याने त्यांची तात्पुरती सोय सामाजिक सभागृहात करण्यात आली आहे.रोज पुरग्रस्त भागात मदतीचा ओघ सुरुच आहे.
आजपासून तीन मदत केंद्र
महापुर व अतिवृष्टीमुळे वाहुन गेलेले रस्ते व पुल कामांचा आराखडा व अंदाजपत्रक तातडीने तयार करण्याचा सुचना जिल्हाधिकारी डाँ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिल्या आहेत. सोमवार आज पासुन तीन ठिकाणी मदत केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची त्यांनी दिली. नवापूर तहसील कार्यालयात आढावा बैठकीत ते बोलत होते. सर्वच विभागाचा अघिकार्याना त्यांनी बैठकीत सांगितले की, मेलेल्या जनावरांची विल्हेवाट शास्त्रोक्त पध्दतीने लावावी.तालुक्यात जनावरांचा लसीकरणाला वेग द्यावा. विद्युत पोल,रोहीत्र,तारा तुटल्या आहेत. त्यांची तातडीने दुरुस्ती करुन वीज पुरवठा सुरळीत करावा.पिके व घरांचा नुकसानीचे पंचनामे पुर्ण करावे. बोकळझर येथील वाहुन गेलेल्या बंधार्याची पुनबांधणी करण्यासाठी लवकरच सुरुवात करण्यात येईल.नगर पालिकेने आपल्या कामांना वेग द्यावा. नगरपालिका, तहसील कार्यालय व गटविकास अधिकारी कार्यालयात त्या त्या विभागाचे मदत केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.