भुसावळ। तालुक्याचे नूतन गटशिक्षणाधिकारी एम.एन. धीमते यांनी पदभार स्वीकारल्याने शिक्षक परिषदेतर्फे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष गणेश फेगडे, उपाध्यक्ष अशोक बार्हे, विनायक कोल्हे, राजेंद्र सुरवाडे, रमेशसिंग पाटील, गोपाळ चौधरी, दीपक सुरवाडे, रविंद्र पोळ, राजू रजाने, रविंद्र पढार, संजय पाटील, संदीप पाटील, किशोर माळी, दिलीप मेढे, महेंद्र राणे, कमलेश नेहेते व यशवंत धायगुडे संजय गायकवाड आदी पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करणार
यावेळी गणेश फेगडे यांनी शिक्षकांच्या विविध समस्यांचा उहापोह केला असता गटशिक्षणाधिकारी धीमते यांनी शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी संघटनेला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे सत्काराला उत्तर देताना सांगितले. सूत्रसंचालन राजेंद्र सुरवाडे यांनी तर आभार रमेशसिंग पाटील यांनी मानले.