जळगाव । येथील रोटरी क्लब जळगाव तर्फे सोमवार दि.23 रोजी नुतन मराठा कॉलेज मध्ये 390 विद्यार्थीनींना मोफत रूबेला लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. याआधी मु.जे.महाविद्यालयाच्या मुलींच्या वस्तीगृहातील 350 मुलींना रोटरी तर्फे मोफत रुबेला लसीकरण व कॅल्शीअमची तपासणी करण्यात आली.
विद्यार्थीनींचे भविष्यातील आरोग्य चांगले राहावे, रोग प्रतिकारक शक्ती वाढावी या हेतूने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्ष नित्यानंद पाटील, प्राचार्य एल.पी.देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. सुत्रसंचालन प्रा.राजेंद्र देशमुख यांनी तर आभारप्रदर्शन युवती सभाप्रमुख प्रा.माधुरी पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी रोटरीचे मेडिकल कमेटी चेअरमन डॉ.सुनील सुर्यवंशी, उदय पोतदार, संदीप शर्मा, सिव्हील हॉस्पीटल नर्सिग कॉलेजच्या सुनीता लांडगे व त्यांच्या 16 विद्यार्थींनी, कॉलेजचे उपप्राचार्य डि.पी.पवार, संजय सुर्वे, आर.बी.देशमुख आदिंसह शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.