नुतन मराठा वकृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर

0

जळगाव : माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीला येत्या 22 फेबु्रवारी रोजी 50 वर्ष पुर्ण होत असल्याच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने 30 डिसेंबर रोजी नुतन मराठा महाविद्यायात जिल्हा स्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल जाहिर करण्यात आला असून प्रथम क्रमांक अमळनेर येथील प्रताप महाविद्यायाच्या विद्यार्थीनी सलोनी जोशी हीने पटकविले.

गुलाबराव देवकर यांनी केले सहकार्य
द्वितीय क्रमांक हर्षल पाटील, तृतीय क्रमांक सिध्देश चव्हाण, चतुर्थ क्रमांक चेतन पाटील तर पाचवा क्रमांक आकांक्षा जळगावकर यांना मिळाले आहे. वकृत्व स्पर्धेचे उद्घाटन उमवीचे कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म.वि.प्र.चे उपाध्यक्ष डी.डी.बच्छाव होते. याप्रसंगी अ‍ॅड.विजय पाटील, विलास पाटील, विकास पवार, एन.डी.पाटील, आदी उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार अनिल पाटील, विधितज्ञ अ‍ॅड.सुशिल अत्रे, रामचंद्र पाटील, प्रा. जयेंद्र लेकुरवाळे, प्रा.शाम सराफ, एल.टी.पवार राजेंद्र देशमुख यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेसाठी माजीमंत्री गुलाबराव देवकर यांनी सहकार्य केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी किशोर पाटील, गणेश निंबाळकर, गौरव वाणी, शितल पाटील, तेजस पाटील यांनी परिश्रम घेतले.