नुतन महापौरांनी गांधी उद्यानाची केली पहाणी

0

जळगाव । पद्मश्री डॉ. भवरलाल जैन थीम पार्क म्हणजेच भाऊंचे उद्यानाच्या उभारणीनतंर जैन समुहाने महापालिकेच्या महात्मा गांधी उद्यान विकसित करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या महीन्यापासून महात्मा गांधी उद्यांनाचा कायापालट करण्याचे काम जैन समुहातर्फे युध्दपातळीवर सुरु आहे. शनिवार 9 सप्टेंबर रोजी नूतन महापौर ललित कोल्हे यांनी या कामाची पाहणी केली. 800 मीटरच्या ट्रॅकसह, लॉनचे बेट विकसीत केले जात असल्याचे ललीत कोल्हे यांनी सांगीतले. 2 आक्टोंबर रोजी महात्मा गांधी जयंतीला या अद्यावत उद्यानाचे लोकापर्ण करण्यात येणार आहे.

कोल्हे यांनी कामाबात काही सूचना अभियंत्यांना दिल्यात. तसेच कामाची माहीती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत माजी उपमहापौर सुनिल महाजन, नगरसेवक अनंत जोशी उपस्थित होते. महात्मा गांधी जयंतीदिनी लोकापर्ण असल्याने कामाला गती आल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगीतले. यासह केशव स्मृती प्रतिष्ठानाकडून आकशवाणी चौक व त्याजवळीलच वैद्य चौकाच्या सुशोभीकरणास देखिल लवकरच सुरुवात होणार आहे. त्यापाठोपाठ लोकसहभागूतनच कालंका माता मंदिर चौकाचा देखिल कायापालट करण्यात येणार असल्याची माहीती महापौर कोल्हे यांनी दिली.