नूतन डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी केली स्थानकाची पाहणी

0

जास्त लांबीच्या रॅमबाबत नाराजी ; प्रवासी सुविधांना प्राधान्य देण्याची ग्ववाही

भुसावळ- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी शुक्रवारी सकाळी भुसावळ रेल्वे स्थानकाला अचानक भेट देत सर्व सोयी-सुविधांचे बारकाईने निरीक्षण केले. स्थानकाच्या दोन्ही दिशांमधील प्रथम दर्शनी परीसर, सर्व फलाटावरील बैठक व्यवस्था, कॅन्टीन, स्टॉलमधील स्वच्छता, प्रतीक्षालय, आरपीएफ कार्यालय, आरक्षण केंद्र, तिकीट बुकिंग कार्यालय, नवीन फलाटावरील संपूर्ण सुविधा, सरकते जिने, जास्त लांबीचे रॅम,बगीचा, शौचालय आदींचे सकाळी 10 वाजेपासून सुमारे दोन ते अडीच तास अत्यंत बारकाईने निरीक्षण केले.

रॅमबाबत गुप्ता यांची नाराजी
निरीक्षणात गुप्ता यांनी जास्त लांबीच्या असलेल्या रॅमबाबत नाराजी व्यक्त करत प्रवासी सुविधेसाठी रॅमची लांबी कशी कमी करता येईल ? याबाबत व अपूर्ण असलेल्या सर्व सुविधा पुरवण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. यावेळी एडीआरएम मनोजकुमार सिन्हा, वरीष्ठ विभागीय अभियंता (समन्वय) राजेश चिखले, वरीष्ठ विभागीय परीचालन व्यवस्थापक स्वप्नील नीला, वरीष्ठ विभागीय वित्त व्यवस्थापक कदम, विभागीय अभियंता एम.एस.तोमर, स्थानक संचालक जी.आर.अय्यर, स्थानक व्यवस्थापक मनोजकुमार श्रीवास्तव, डीसीटीआय एच.एस.आलुवालिया, वाणिज्य निरीक्षक जीवन चौधरी, शैलेश पारे, आरपीएफ निरीक्षक विजय नायर यांच्यासह सर्व विभागाचे वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.