जळगाव । मावळते जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पदभार नवनियुक्त दत्तात्रय शिंदे यांच्याकडे शुक्रवार 3 ऑगस्ट रोजी पोलीस अधिक्षक कार्यालयात सोपवला. जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्विकातांना नूतन जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, मावळते पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, विभागीय पोलीस अधिक्षक सचिन सांगळे, डीवायएसी राजेशसिंह चंदेल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल कुर्हाडे आदी अधिकार्यांची उपस्थिती होती.