भुसावळ- नूतन प्राथ.शिक्षक सोसायटीच्या उपसभापती पदावर निलेश पाटील यांची सोमवारी वर्णी लागली. उपसभापती पदासाठी निवडणूक झाली. निवडणूक निर्णय अधिकारी अयुब तडवी होते. उपसभापती पदी निलेश भास्कर पाटील यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे निवड बिनविरोध घोषित करण्यात आली. माजी उपसभापती यांच्यावर अविश्वास पारीत झाल्यानंतर हे पद रीक्त होते. निवडीप्रसंगी कैलास तायडे सभापती, सुरेश इंगळे, गंगाराम फेगडे, विजय कोल्हे, कृष्णा सटाले, हरीश बोंडे, मधुभाऊ लहासे, प्रदीप सोनवणे, शोभा इंगळे उपस्थित होते. नवीन सभापती कैलास तायडे व उपसभापती यांनी कर्जासाठी लागणारे नंबर एका महिन्याच्या आत बंद करणार असल्याचे सांगितले.