संस्थेच्या कामकाजाचा घेतला आढावा
तळेगाव दाभाडे : येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार कृष्णराव भेगडे होते. यावेळी संस्थेचे सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार सुरेशभाई शहा, विश्वस्त मुकुंदराव खळदे, दामोदर शिंदे, यादवेंद्र खळदे, सोनबा गोपाळे, राजेश म्हस्के, चंद्रकांत शेटे, डॉ. दिपकभाई शहा, महेशभाई शहा, देवेंद्र बारमुख यांच्यासह शंकरराव नारखेडे, शंकरराव शेवकर, दिलीप जोशी व सदस्य उपस्थित होते. संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांनी प्रास्ताविकामध्ये संस्थेच्या संपूर्ण कामकाजाचा आढावा घेतला व भविष्यात संस्थेच्या माध्यमातून होणार्या शैक्षणिक कार्याची माहिती सभागृहास दिली. सभेपुढील सर्व विषय सर्वानुमते मंजूर झाले.
हे देखील वाचा
विद्यार्थ्यांना घडविणारी संस्था
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक ही संस्था ऐतिहासिक वारसा जपणारी आहे. आपली संस्था ही गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर यांनी स्थापन केलेली आहे. या संस्थेच्या अभियांत्रिकीसह अनेक शाखा निर्माण झाल्या आहेत. मावळातील विद्यार्थ्यांना घडवणारी ही संस्था दिवसेंदिवस प्रगतीकडे वाटचाल करत असून पुढील येणार्या वर्षांमध्ये ही संस्था अनेक विद्यार्थी घडवून चांगले कार्य करीत राहील, असे प्रतिपादन संस्थचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे, खजिनदार सुरेशभाई शहा, संस्थचे माजी अध्यक्ष वसंतदादा खांडगे, केशवराव वाडेकर, मुकुंदराव खळदे, डॉ.कृष्णकांत वाढोकर, डॉ. अशोक निकम, जगन्नाथ भेगेडे पाटील, या संस्थेच्या जेष्ठ सदस्यांचा संस्थेतर्फे सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेने केरळ पूरग्रस्तांसाठी एक लाख पंचाहत्तर हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे सुपूर्द केला.