जळगाव। शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात दोन गट एकमेकात भिडल्याने त्याचे रूपांतर दगडफेकीत झाले. अचानक झालेल्या वादामुळे महाविद्यालयातील शिक्षक कर्मचार्यांची चांगलीच धावपळ उडाली. महाविद्यालयातील नूतन हायस्कुलच्या प्रांगणामध्ये हाणामारीचे रूपांतर दगडफेकीमध्ये झाले. यामध्ये दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहे. विद्यालयातीलच एकाला 30 ते 35 मुले मारत असल्याचे समजताच दुसर्या गटाचे विद्यार्थी त्याठिकाणी पोहचले जखमी विद्यार्थ्यांची अवस्था पाहून दोन गटात हाणामारी जोरात वाद निर्माण झाला होता. घटना झाल्याने पोलिसांनी धरपकड करण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर हल्लेखोर हाणामारी करण्यार्यापैकी चार जणांना ताब्यात घेतले असून इतर जण पसार झाले आहे. यावेळी यापरीसराला छावणीचे स्वरूप आले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला असून सायंकाळपर्यंत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अॅटो रिक्षातून आले हल्लेखोर
नूतन मराठा महाविद्यालयाच्या परिसरात 2 ते 3 रिक्षा तसेच काही मोटार सायकल घेऊन हल्लेखोर नूतन मराठाच्या महाविद्यालयाच्या पार्किगमध्ये दाखल झाले. हल्लेखोरांनी यावेळी हिमांशु नामक महाविद्यालयीन विद्यार्थ्याला टार्गेट केले. अचानक त्याच्यावर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण परिसरात खबळ निर्माण होऊन धावपळ उडाली. हल्लेखोर बाहेरून आल्याचा संशय आल्याने दुसरा गट त्याठिकाणी पोहचून सिनेसिनेस्टाइल हाणामारीचे रूपांतर दगडफेकीत झाले. या दगडफेकीत महाविद्यालयातील कर्मचारी राजेंद्र देशमुख याना दगड लागल्याने दुखापत झाली आहे.
हिमांशुसह एक विद्यार्थी जखमी
दोन गटातील हाणामारी माझ्या कडे का बघतो या उद्देशाने झाल्याचे विद्यार्थ्यांकडून बोलले जात आहे. हा जाब कांचन नगर येथील हिमांशू नावाच्या विद्यार्थ्यांने विचारला असता 30 ते 35 परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी त्याला मारहाण केल्याने त्याला डोक्याला मार लागला होता. मोठया प्रमाणात रक्तश्राव होत असल्याने मारहाण कर्त्यां पासून तो पळत सुटला. महाविद्यालयाच्या बाहेर आल्यावर देखील त्याला हल्लेखोरांनी मारहाण केल्याने त्याची अवस्था गंभीर झाली होती. त्याची झालेली अवस्था बघून त्याला उपस्थित नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी त्याला दाखल केले.
315 विद्यार्थ्यांची उर्दू संयुक्त मराठी विषयाची परीक्षा
उर्दू संयुक्त मराठी या विषयाची परीक्षा देण्यासाठी 315 विद्यार्थी शहरातल्या उर्दू शाळेतून नूतन मराठा परिसरात दाखल झाले होते. 11 ते 1 विद्यार्थ्यांची परीक्षा होती. वाद झाला तेव्हा आम्ही प्रश्नपत्रिकेच्या कामात व्यस्त होतो. असल्याची माहिती केंद्र संचालक ठाकरे यांनी दिली. या वेळी मोठी धावपळ उडाली होती. काही वेळातच हाणामारीचे रूपांतर दगडफेकी मध्ये झाल्याने महाविद्यालय परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घटना स्थळी महाविद्यालतील प्राचार्य ए.पी.देशमुख यांनी पोलिसांशी संपर्क करून घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस घटना स्थळी दाखल झाले.
सुरक्षा रक्षक नसल्याने होतात वाद
नूतन मराठा महाविद्यालय प्रवेशव्दारावर सुरक्षा रक्षक नसल्याने अनोळखी लोक महाविद्यात येत असतात. यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण होऊन ते वाद घडवून आणण्याचा प्रयत्न करीत असतात गेल्या आठ दिवसा पूर्वी काही बाहेरच्या तरुणांनी महाविद्यालयात येऊन एक विद्यार्थ्याला मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. प्राचार्य देखमुख याना वारंवार पत्र व्यवहार झाला असून मात्र त्याची दाखल आतापर्यंत घेतली नसल्याची माहिती कर्मचारी राजेंद्र वराडे यांनी दिली आहे.