पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील बहादरपूर येथील नूतन शिक्षण संस्थेच्या त्रैवार्षीक निवडणुकीत परिवर्तन पॅनलने यश संपादन केले आहे.
येथील नूतन शिक्षण संस्थेच्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. यात उमेशचंद्र वैद्य यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केली होती. त्यांच्या विरोधात जिल्हा परिषदेचे निवृत्त उप मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी करून निवडणुकीत चुरस निर्माण केली होती. मात्र या चुरशीच्या निवडणुकीत उमेशचंद्र वैद्य यांनी बाजी मारली. या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे अध्यक्ष उमेशचंद्र विलास वैद्य, उपाध्यक्ष अनिल सुधाकर शिंपी, कोषाध्यक्ष राजेंद्र आसाराम चौधरी, व्यवस्थापक पदासाठी भास्कर सहादु महाजन, तर संचालकपदी बहादरपूर व शिरसोदे येथील वसंत देविदास मेखे, देविदास आसाराम मारवाडी, काशीनाथ लोटन चौधरी, कैलास राघो पाटील, प्रकाश माधवराव बडगुजर, सुभाष संभाजी गुरव आदींची सरशी झाली. तर विकास पॅनलचे संजय भिकाजी भावसार व मोतिराम गोविंद बोरसे निवडून आलेत.