सांगवी : येथील निळू फुले रंगमंदिरात नृत्यअविष्कार 2018 या कथ्थक नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक शत्रुघ्न काटे उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रिया बिरारी व शिल्पी बॅनर्जी यांनी आपल्या विद्यार्थ्यांसोबत कथ्थक नृत्य सादर केले. यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी, या नृत्याविष्कार 2018 कथ्थक नृत्य कार्यक्रम खूप उत्तम कार्यक्रम आहे. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. आज जणू नागरिकांना भारतीय संस्कृतीशी निगडित असलेल्या नृत्य कलेचा विसरच पडला आहे. आजच्या पिढीवर पाश्चात्य संस्कृतीचा एवढा प्रबळ प्रभाव आहे की, भारतीय संस्कृतीशी निगडित असलेल्या कथ्थक, भरतनाट्यम, कुचिपुडी आदी सांस्कृतिक नृत्याचे तर नावसुद्धा माहिती नाहीत. यामुळे नागरिकांमध्ये सांस्कृतिक नृत्याविषयी गोडी निर्माण होण्यासाठी नृत्याविष्कार सारख्या सांस्कृतिक कार्यक्रमाची खूप आवश्यकता आहे. यावेळी नगरसेविका निर्मला कुटे, सामाजिक कार्यकर्ते जयनाथ काटे, उन्नती सोशल फाउंडेशनचे संजय भिसे व कुंदा भिसे, पी.के.इंटरनॅशनल स्कुलचे अध्यक्ष जगन्नाथ काटे, शर्मिला मुजुमदार, पी.के.इंटरनॅशनल स्कुल प्राचार्या दिपाली जुगुळकर, अविनाश कामटिकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल पाटील व सागर बिरारी यांनी केले.