नृत्य महोत्सवात धमाल

0

पिंपरी-चिंचवड :- चिंचवडमधील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित लायन्स टॅलंट हंट 2018 आणि नृत्य महोत्सव उत्साहात पार पडला. यामध्ये “हसरा नाचरा लाजरा श्रावण आला” व “विठूचा गजर” या नृत्यातून भक्तीरसाचा आनंद देत नृत्य कलाकारांनी रसिकांची मने जिंकली. यावेळी गायन, वादन, नृत्य स्पर्धांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात लायन्स क्लब इंटरनॅशनल प्रांत 3234 डी 2 आणि नृत्यतेज अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी पार पडला. यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान, अभिनेत्री शोभा प्रधान, कोरिओग्राफर फिरोज मुजावर, बाल कलाकार पवन मोहिते, ज्येष्ठ अभिनेते रवीकांत तुळसकर, पुण्यकर उपाध्ये आदी उपस्थित होते.

यांचे बहारदार नृत्य
नाट्यछटा स्पर्धेत तन्वी हरी प्रथम, सानुई भाके द्वितीय, आरिशा कुंभार तृतीय आणि ईशान्य राहुरकर याने उतेजनार्थ पारितोषिक पटकावले. वंदन स्पर्धेत अर्चित अग्रवाल प्रथम, शंतनू देशमुख द्वितीय, प्रणव तिकोने आणि आदिती प्रभू हिने उतेजनार्थ बक्षीस मिळविले. गायन स्पर्धेत सिद्धार्थ गुगुळे प्रथम, अनिकेत थोरात द्वितीय, स्पृहा रौमिक तृतीय आणि मोनिशा कुलकर्णी उतेजनार्थ, ग्रुप डान्समध्ये 6 ते 10 वयोगटात राजवीर परदेशी प्रथम, आर्यन तिकोने द्वितीय, निशीता बिर्ला तृतीय. 10 ते 15 वयोगटामध्ये प्रापती भोईटे प्रथम, आदिती माळी द्वितीय, रिया कछवा हिने तृतीय क्रमांक तर 16 ते 31 वयोगटात धनेश पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला. मिसेस आयकॉन उज्वला ठाकर तर मिस आयकॉन म्हणून प्राजक्ता चंद्रात्रे यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे निवेदन दीप्ती कशाळकर यांनी केले.