शिरपूर । येथील आर.सी.पटेल औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी 11 फेब्रुवारी रोजी फॉस्टरींग प्लॅटफार्म ऑफ नॅनो-टेक्नॉलॉजी स्टडीज ऑन फॉर्म्युलेशन फार्माको डायनामिक अॅण्ड फार्माको कायनेटीक या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयातील एस.एम.पटेल ऑडीटोरीयम हॉलमध्ये राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. राज्यातील व राज्याबाहेरील 300 हुन अधिक विद्यार्थ्यांनी या परिषदेत सहभाग नोंदविला. येत्या काळात नॅनो रोबोटीक्स्चा मानवीय जीवन सुसज्ज करण्यात कसा उपयोग करता येईल याची माहीती उपस्थितांनी दिली. विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रेझेंटेशनद्वारे सादरीकरण केले.
आयोजित कार्यक्रमात यांचे लाभले मार्गदर्शन
आर.सी.पटेल महाविद्यालयात आयोजित नॅनो-टेक्नॉलॉजी विषयावरील एकदिवसी राष्ट्रीय परिषदेसाठी राज्यातील तज्ञ मार्गशदर्शक उपस्थित होते. महाराष्ट्र इन्स्टिटयुट ऑफ फार्मसी कॉलेज कोथरुड पुणे येथील प्रा.डॉ.स्वाती जगदाळे, ताथवडे पुणे येथील राजश्री शाहू फॉर्मसी कॉलेजचे फॉर्मास्युटीक्स विभाग प्रमुख डॉ.अविनाश टेकाडे, एन.एम.आ.एम.एस मुंबई अभिमत विद्यापीठाचे डॉ.अनिल पेठे, आर.सी.पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.जे.सुराणा आदी उपस्थित होते.
डॉ.स्वाती जगदाळे मार्गदर्शकांचे मत
राष्ट्रीय परिषदेच्या प्रमुख मार्गदर्शन डॉ.स्वाती जगदाळे यांनी नॅनो बायोफार्मासुटिक्स बाबत माहिती देतांना नॅनो एक्स-रे च्या साहाय्याने कर्क रोग कसा बरा होऊ शकतो याविषयी मार्गदर्शन केले. याविषयी जगदाळे यांनी चित्रफीत दाखवून नॅनो-टेक्नॉलॉजीचे महत्व पटवुन दिले. याचे प्रत्यक्ष चित्रफीत दाखवून नॅनो- टेक्नॉलॉजीचे महत्व पटवून दिले. उमवीचे माजी कुलगुरु प्रा.के.बी. पाटील हे राष्ट्रीय परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी औषधनिर्माणशास्त्राचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्याना इंटर डीसीप्लीनरी सायन्सचे महत्त्व सांगितले. अमळनेर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.एल.ए.पाटील यांनी नॅनो-टेक्नॉलॉजीच्या प्रवासाविषयी माहिती दिली. डॉ.अविनाश टेकाडे यांनी सूक्ष्म तंत्रज्ञानातील आव्हाने व त्याचे उपयोग समजावून सांगत फार्माको कायनेटीक व फार्माको डायनामीक विषयांची माहिती दिली
यांनी घेतली परिश्रम
संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरीश पटेल, उपनगराध्यक्ष भुपेश पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे आयोजन करण्यात आले. मुख्य समन्वयक म्हणून उपप्राचार्य डॉ. ए. ए. शिरखेडकर, उपप्राचार्य डॉ.पी.एच.पाटील, प्रा.एस.एस.चालीकवार यांनी कामकाज पाहिले. स्थानिक आयोजक समिती डॉ. सी. आर. पाटील, डॉ. एच. एस. महाजन, डॉ. ए. यू. टाटिया, प्रा.डॉ.प्रीतम जैन, प्रा.डॉ. नितीन हासवानी, जितेश जाधव यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन प्रा.अभिजीत कुलकर्णी व प्रा.डॉ.योगिता अग्रवाल यांनी केले. आभार उपप्राचार्य डॉ. ए. ए. शिरखेडकर यांनी मानले. राज्यातील व राज्याबाहेरील 300 हुन अधिक विद्यार्थ्यांनी या परिषदेत सहभाग नोंदविला.