नॅशनल एज्युकेशनल संस्थेच्या 14 संचालकांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा

0

यावल- शासनाकडून शिक्षक भरतीवर बंदी असताना प्रशासनाकडून मंजुरी न घेता शिक्षक भरती करणे तसेच संस्थेचे लेखा परीक्षण न केल्याने येथील नॅशनल एज्युकेशन संस्थेच्या 14 संचालकांवर यावल न्यायालयाच्या आदेशान्वये येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नॅशनल एज्युकेशन सोसायटी ही जिल्ह्यातील अग्रणी संस्था आहे.

या संचालकांविरुद्ध दाखल झाला गुन्हा
संस्थेचे सभासद महेबुबखान हिदायतखान यांनी येथील न्यायालयात दिलेल्या फिर्यादिनुसार संस्थेचे चेअरमन हाजी मो.ताहेर शे.चांद, हाजी इकबालखान, हाजी रउफोद्यिन सैफुद्दीन, गुलाम रसुल हाजी गुलाम दस्तगीर, हाजी अजीजखान हमीदखान, हाजी शे.इब्राहीम शे.चांद, हाजी हुसेनखान भिकारीखान, मुस्तफा सुव्हानखान, अताउल्लाखान हाजी सैफुल्लाखान, अयुबखान हमीदखान, हाजी गुलाम रसुल हाजी अ.नबी, हाजी शब्बीरखान, जफरुल्लाखान अमानुल्लाखान हाजी युसुफखान ताहेरखान या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. राज्य शासनाने शिक्षक भरतीवर बंदी केली असतांना 12 शिक्षकांची संस्थेने अनधिकृत भरती केली तसेच संस्थेचे ऑडीट केले नाही. 2014 मध्ये निवडून आलेल्या संचालक मंडळाचा कार्यकाळ 2017 मध्ये संपल्यानंतरही विश्वस्त मंडळाची निवडणूक नसल्याने संस्थेचा कारभार बेकायदेशीरपणे सुरू आहे. तपास पोलिस निरीक्षक डी.के.परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजीत ठाकरे, कॉ.संजय तायडे करीत आहेत.