नॅशनल पार्क मुख्य अ‍ॅम्बॅसिडरपदी अभिनेत्री रविना टंडन

0

मुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची उद्यान राजदूत अर्थात नॅशनल पार्क मुख्यअ‍ॅम्बॅसिडर म्हणून काम करण्यास अभिनेत्री रविना टंडन हिने मान्यता दिली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या बाबतचा प्रस्ताव टंडनला दिला होता. त्याचा स्वीकृतीचे पत्र तिने वनमंत्र्यांना पाठवले आहे.

हीच बाब लक्षात घेऊन मुनगंटीवार यांनी मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची उद्यान राजदूत होण्याची विनंती तिला केली होती. त्यास रविनाने होकार दिला असून जंगल संवर्धन, संरक्षणाची व्यापक जनजागृती आणि उद्यान विकासासाठी विविध उपक्रमांच्या आखणीच्या कामात त्यांची मोलाची मदत होईल असा विश्‍वास वनमंत्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.