पुणे:- ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क’ मध्ये पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला नववे स्थान प्राप्त झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुणे विद्यापीठाने आपला शैक्षणिक क्षेत्रातला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. गेल्या वर्षी विद्यापीठाला दहावे स्थान प्राप्त झाले होते
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी देशातल्या विद्यापीठांची यादी नुकतीच जाहीर केली.