नेटकऱ्यांचा अक्षयवर हल्लाबोल

0

मुंबई : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या देशभक्ती जागवणारा अभिनेता बनला आहे. परंतु काही दिवसापूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्याच्या नागरिकत्वाचा मुद्दा मांडला होता.

अक्षय कुमार हा कॅनडाचा नागरिक आहे. कायदेशीररित्या त्याने या देशाचे नागरिकत्व स्वीकारले असून तो अनिवासी भारतीय म्हणून भारतात राहत असतो. शिवाय अलिकडे त्याचे चित्रपट पाहिले तर त्यात तो देशभक्ती गात असतो. यावर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. सुमारे दहा वर्षापूर्वी ‘सिंग इज किंग’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार कॅनडा येथे गेला  होता.

 

टोरँटोमधील चाहत्यांसमोर बोलताना त्याने आपण या देशालाच आपले घर मानत असल्याचे म्हटले होते. निवृत्तीनंतर याच देशात राहणार असल्याचेही तो म्हणाला होता. हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यामुळे भाजप विरोधी नेटकऱ्यांना त्याचे वावडे वाटू लागले आहे.