आळंदी : महाराष्ट्र राज्य टपरी,पथारी,हातगाडी पंचायतीचे आळंदी विभागीय कार्याध्यक्षपदी येथील सामाजिक कार्यकर्ते तुषार नेटके यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती आळंदी अध्यक्ष मल्हार काळे यांनी दिली. या नियुक्तीचे पत्र प्रदेश अध्यक्ष बाबा कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली देण्यात आले. या प्रसंगी सचिव प्रल्हाद कांबळे,आळंदी अध्यक्ष मल्हार काळे आदी उपस्थित होते. या नियुक्तीचे आळंदी परिसरात स्वागत करण्यात आले आहे. येथील टपरी,पथारी,हातगाडी व्यावसायिकांचे अडीअडचणीं सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे नियुक्ती नंतर नेटके यांनी सांगितले.