भुसावळ । नाहाटा महाविद्यालयात नेट सेट व पीईटी संदर्भात मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. प्रा.डॉ. एस.आर. चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. एम.व्ही. वायकोळे उपस्थित होत्या. व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. एस.व्ही. पाटील, प्रा. बी.एच. बर्हाटे, गणित विभागप्रमुख प्रा. ए.पी. नवघरे, प्रा. ए.एच. पाटील उपस्थित होते.
यांनी केले मार्गदर्शन
पहिल्या दिवसाच्या दुसर्या सत्रात डॉ. एस.आर. चौधरी यांनी बिजगणित विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. सी.व्ही. आगे यांनी टोपोलॉजीवर तर दुसर्या दिवशीच्या दुसर्या सत्रात प्रा. ए.पी. नवघरे यांनी डिफरेंचल इक्युटेशन याविषयावर मार्गदर्शन केले.
प्रमाणपत्रासह शैक्षणिक नोट्सचे वितरण
डॉ. जी.एन. चौधरी, डॉ. एच.एल. तिडके, डॉ. जे.एस.व्ही.आर. कृष्णप्रसाद, डॉ. रुपेश मोरे, प्रा. बी.बी. दिवटे यांनी मार्गदर्शन केले. समारोपानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व अभ्यासासाठी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यशाळेत एकूण 4 महाविद्यालयातील 47 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे नेट सेट विभाग समन्वयक प्रा. व्ही.जे. पाटील, कार्यालय अधिक्षक भगवान तायडे, संगणक शास्त्र विभागातील विनय चौधरी, प्रा. शिवादेवी देशमुख, प्रा. शेख तौसिक, प्रा. नेेहा महाजन, प्रा. प्रणित कोलते, प्रा. जितेेंद्र पाटील, प्रा. समाधान पाटील तर विद्यार्थ्यांमध्ये कल्याण देशमुख व अंकिता भारंबे यांनी परिश्रम घेतले.