भुसावळ। येथील जनविकास मंडळातर्फे तापी प्रेरणा श्रवण उत्सवा अंतर्गत जाहिर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यात मंगळवार 21 रोजी सायंकाळी 6 वाजता अहिल्यादेवी कन्या विद्यालयात ‘नेताजी एक क्रांतीपर्व’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी वक्ते म्हणून दीपनगर येथील अंबरीष पुंडलिक हे राहतील. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन करताना ते नेताजींची चवळवळ, आझाद हिद सेनेचा पराक्रम, नेताजींच्या मृत्यूचे रहस्य आणि त्यांच्या व्यक्तीमत्वाबद्दल भारतीयांनी वैयक्तिक व शासकीय पातळीवर दाखवलेली उदासिनता या विषयावर प्रकाश टाकतील. तरी खरा इतिहास जाणून घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जनविकास मंडळाचे अध्यक्ष पंडित साखरे यांनी केले आहे.