भुसावळ । नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त शहर व परिसरातील विविध सामाजिक व राजकीय संस्था, संघटनांतर्फे सामाजिक उपक्रम राबविण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.
राजीव गांधी वाचनालय
राजीव गांधी वाचनालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी करण्यात आली. प्रतिमापूजन मो. मुनव्वर खान व जे.बी. कोटेचा यांनी करुन प्रतिमेस अभिवादन केले. याप्रसंगी जगपालसिंग गील यांनी मनोगत व्यक्त केले. वैद्य रघुनाथ सोनवणे, दिपक जैन, आर.बी. भवार, अॅड. एम.एस. सपकाळे, विनोद शर्मा, सलिम गवळी, यु.एल. जाधव, विजयन खाडे, सायराबानो, यास्मिनबानो, विनोद राठोड, चंद्रसिंग चौधरी, प्रदिप नेहेते, गोविंदा पाटील, प्रमोद पाटील, कैलास चौधरी यांची उपस्थिती होती.
कंडारी येथे रक्तदान
तालुक्यातील कंडारी येथील जागृतीचा राजा फाऊंडेशनतर्फे ग्रामपंचायत कार्यालयासमोर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. विशेष म्हणजे गावातील महिलांनी देखील या शिबीरात उत्स्फुर्तपणे सहभाग घेवून रक्तदान केले. कार्यक्रमाचे उद्घाटन पोलिस निरिक्षक ए.के. पाडळे यांच्या हस्ते करण्यात आले. भुसावळ येथील धन्वंतरी रक्तपेठी यांनी रक्त संकलित केले. या रक्तदान शिबिरास संपुर्ण गावतुन स्त्री, पुरुषांसह तरुणांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
शिबीरात यांची होती उपस्थिती
याप्रसंगी सरपंच योगिता शिंगारे, उपसरपंच रूपाली दुसाने, पोलिस पाटील रामा तायडे, तंटामुक्ती अध्यक्ष बंसी मोरे, पंचायत समिती सदस्य संतोष निसाळकर, ग्रामपंचायत सदस्य डॉ. सुर्यभान पाटील, यशवंत चौधरी, शामा मोरे, माधुरी पाटील, चंद्रसिंग पाटील उपस्थित होते. यशस्वीतेसाठी फाऊंडेशनच्या पदाधिकार्यांसह गावातील युवक हर्षल नारखेडे, चंदन तायडे, हेमंत मोरे, भुषण मोरे यांचे सहकार्य लाभले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात प्रतिमा पूजन
वांजोळा रोड परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी गोपाळ भंगाळे होते. संस्थेचे अध्यक्ष प्रा. उत्तम निकम यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवन कार्यावर मनोगत व्यक्त केले. सचिव विमल निकम यांनीदेखील मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन सुशिल निकम यांनी केले. यशस्वीतेसाठी विजय तायडे, आशिष शेगावकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी राज देवगडे, मनोहर वारके, वामन नेमाडे, प्रमोद नेमाडे, वासुदेव सोनार, आर.आर. खुरपुडे, मोहन नारखेडे, संजय नेमाडे, गोपाळ बर्हाटे, विलास शेगावकर, धम्मरत्न चोपडे, विवेक हिवरे उपस्थित होते.