नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमीत्त अभिवादन

0

भुसावळ । शहर व परिसरातील विविध सामाजिक व राजकीय संस्था संघटनांतर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांंची जयंंती उत्साहात साजरी करण्यात आली.
शहर शिवसेनेतर्फे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक मुकेश गुंजाळ, ज्येष्ठ शिवसैनिक अबरार ठाकरे, युवा सेना शहर अधिकारी मिलींद कापडे, उपशहरप्रमुख जय खराडे, नमा शर्मा, सोनी ठाकूर, नाना मोरे, निखिल सपकाळे, नामदेव बर्‍हाटे आदी उपस्थित होते.

टोकरे कोळी महासंघ
आदिवासी टोकरे कोळी महासंघातर्फे युवा जिल्हाध्यक्ष दिपक सोनवणे यांच्या हस्ते सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यशस्वीतेसाठी देवेंद्र कोळी, विनोद सोनवणे, विकास सपकाळे, योगेश कोलते, उमेश पाटील, संदिप कोळी, विशाल कोळी, अंकित शर्मा, मोहन पाटील यांनी परिश्रम घेतले.

बाळासाहेबांना अभिवादन
मुक्ताईनगर येथील साई चौकात स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेचे पुजन व अभिवादन शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अभिवादनाचा कार्यक्रम सुरु असतानांच जयंतीचे औचित्य साधुन भाजपाचे माजी उपसरपंच जाफरअली नाजीरअली यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गोपाळ सोनवणे, तालुका प्रमुख छोटु भोई, उपतालुकाप्रमुख राजु तळेले, विधानसभाक्षेत्रप्रमुख सुनिल पाटील, शहरप्रमुख बाळा भालशंकर, राजु हिवराळे, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान, हारुन मिस्तरी, प्रफुल्ल पाटील, अमरदीप पाटील, विभागप्रमुख विठ्ठल तळेले, भाविसे तालुका प्रमुख निलेश बोराखेडे, नितीन कांडेलकर, किशोर पाटील, नरेंद्र पाटील, गणेश टोंगे, संतोष माळी, राजु कापसे, किरण कोळी, जितु पाटील, पप्पु मराठे, नवनित पाटील, रामराव पाटील, शुभम तळेले, आनंदा ठाकरे, प्रविण चौधरी, संतोष कोळी आदींंसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

तांदलवाडीत नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी
खिर्डी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस चौक व मित्र मंडळ तांदलवाडीला सुभाषचंद्र बोस यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शशांक पाटील यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला हार घालून पूजन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष सुनिल पाटील, सचिव गोपाल महाजन, सदस्य डॉ. प्रकाश पाटील, सुनिल पाटील, उदय चौधरी, सदाशिव पाटील, संजय महाजन, मनू पाटील, शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय तायडे आदी हजर होते.