नेतृत्व न करता समनव्ययाची भूमिका निभावेल-संभाजीराजे

0

पुणे : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाचे नेतृत्व संभाजीराजे किंवा उदयनराजे यांनी करावे अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. आज खासदार संभाजीराजे भोसले पुणे येथे आले होते. त्यावेळी मराठा समाजाने त्यांना घेराव घातला होता.यावेळी त्यांनी मी नेतृत्व करणार नसून समाजाच्या मागे खंबीरपणे उभा राहील आणि एका समनव्यकाची भूमिका पार पडणार असल्याचे सांगितले.

अद्याप मुख्यमंत्र्याकडून बैठकीचे कोणत्याही प्रकारचे निमंत्रण आले नसून त्या स्वरूपाचे बैठक लवकरात लवकर बोलवावी. त्या बैठकीला माझ्यासह सर्वच मराठा समाजातील प्रत्येक घटकाला सामावून घेतले जावे. मात्र ही बैठक बंद दाराआड न होता. संबंध महाराष्ट्राला समजेल अशी अशी व्हावी. त्यामध्ये प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीना देखील बोलवावे. त्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात यावी.अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली.

आज पुण्यात खासदार अनिल शिरोळे आणि खासदार संजय काकडे यांच्या कार्यालयाबाहेर बाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तर यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये. या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर खासदार छत्रपती संभाजी राजे एका कार्यक्रमासाठी आले असताना. त्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी त्यांना घेराव घातला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आणि गुन्हे मागे घेण्यात यावे. या मागण्याचे निवेदन देखील त्यांनी यावेळी दिले.