नेपाळचे पंतप्रधान के.पी.ओली यांच्या राजीनाम्याची मागणी

0

काठमांडु: नेपाळचे पंतप्रधान के.पी.ओली यांनी भारत सरकार नेपाळचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. या वक्तव्यावरून ओली सरकार अडचणीत आले आहे. नेपाळचे माजी पंतप्रधान पुष्पा कमल दहल प्रचंड यांच्यासह सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या विरोधात राजीनाम्याची मागणी केली.

नेपाळच्या विरोधी पक्षांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान ओली यांची टीका राजकीयदृष्ट्या योग्य नव्हती असे प्रमुख नेत्यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधानांना या आरोपांवरील पुरावे सादर करण्याचे आणि आपला राजीनामा देण्यास विरोधकांनी सांगितले. पंतप्रधानांनी नैतिकतेच्या दृष्टीनं आपला राजीनामा दिला पाहिजे असे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितले.