नेपाळमध्ये नदीत जीप कोसळल्याने ६ भारतीय ठार

0

सुनसरी-नेपाळमध्ये एक जीप नदीत कोसळल्याने झालेल्या अपघातात ६ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना भारताच्या सीमेजवळ नेपाळमधील सुनसरी जिल्ह्यात घडली. सोमवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली. या अपघातात जीप चालकासह इतर चार लोक जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चालकाला अटक केली आहे. सर्व प्रवासी हे धनकुटा जिल्ह्यातील भेडेटार हिल स्थानकावर परतत होते.

अपघातग्रस्त जीपवर भारतीय नंबर प्लेट होती. ही जीप कोसी नदीत कोसळली. मुसळधार पावसामुळे सध्या नदी ओसंडून वाहत आहे. जीप नदीत कोसळल्यानंतर तीन लोकांचा जागीच तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस अधिक्षक रमेशकुमार लमसाल म्हणाले की, नदीतून जीपला बाहेर काढताना तीन मतृदेह सापडले. जीपमध्ये प्रवास करणारे सर्व भारतीय हे बिहारमधील सुपोल जिल्ह्यातील रहिवासी आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.