नेपाळ पुरातून वाहून गेंडा आला भारतात

0

नेपाळ व भारतात प्रामुख्याने आढळणारे एक शिगी गेंडे आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आहेत ते गेंडे वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. नेपाळच्या चितवन नॅशनल पार्कमधील एक गेंडा पुरातून वाहत असाच भारतात पोहोचला. भारतातल्या बुगाह या गावी ही मादी गेंडा 42 कि.मी. अंतर पुरातून आली व भारतातील वन अधिकार्‍यांनी तिला वाचवले.

नेपाळमधल्या पुरात अडकलेल्या चितगाव उद्यानातील अन्य चार गेंड्यांना वाचवण्याचे प्रयत्नही सुरू असून, या पुरात 1 गेंडा मरण पावला आहे. पुरात वाहून जाणार्‍या गेंड्यांना वाचवण्यासाठी 40 वन कर्मचारी काम करत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात वाहता आलेल्या अडीच वर्षीय मादी गेंड्याला भारतातल्या वन अधिकार्‍यांच्या मदतीमुळे वाचवण्यात यश मिळाले. चितगाव उद्यानात 600 गेंडे आहेत. आसाममधील काझिरंगा नॅशनल पार्क हेही एकशिंगी गेंड्यांचे वसतिस्थान असून, तेथल्या पुराने 6 गेंड्यांचा जीव घेतला आहे.