नेपाळ-भारत संबंध मजबूत

0

काठमांडू । नेपाळच्या पंतप्रधानांच्या भारत दौर्‍याने नेपाळ आणि भारताचे हितसंबंध अधिकच दृढ झाले असल्याचे नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी म्हटले आहे. भारत-नेपाळमध्ये विश्‍वास आणखी वाढला आहे. तीन दिवसांच्या भारत दौर्‍यानंतर मायदेशी परतलेल्या शर्मा ओली यांनी म्हटले की, भारतीय नेत्यांशी झालेली चर्चा फारच सद्भावनापूर्वक आणि सकारात्मक होती. दोन्ही देशांचे संबंध अधिकच मजबूत होण्यास ही चर्चा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.