कॅलिफोर्निया : अंतराळनिरीक्षकांना नेप्चुन ग्रहाच्या पृष्ठभागावर मध्यभागीच वादळ घोंघावताना दिसले आहे. असा तेजस्वी ढग त्यांना कधीही दिसला नव्हता. तो वादळाचाच असून त्याचा आकार पृथ्वीएवढा आहे. ९००० किलो मीटरपर्यंत वादळाची व्याप्ती आहे आणि विषुववृताच्या ३० अंश रेखांश आणि अक्षांश मध्ये ते पसरले आहे.
कॅलिफोर्निया विद्यापीठातील नेड मॉल्टर यांनी हे वादळ २६ जुन ते २ जुलै दरम्यान पाहिले. हवाईच्या केक अंतराळ वेधशाळेत पहाटेच्या संधीप्रकाशात हे वादळ त्यांना दिसले. याआधी नेप्चुनच्या धृवावर छोटी वादळे दिसली आहेत. हे वादळ मात्र मध्यावर आहे. या ग्रहावर वायुंचे गडद भोवरे दिसतात व त्यांच्याभोवती विराट ढग आहेत. वायु वर जातात व थंड होतात मग त्यांचे ढग बनतात. नेप्चुनवर मिथेनचे ढग आहेत.