नवी दिल्ली – भारतीय नेमबाज अभिनव बिंद्रा याची आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटनेने खेळाडूंसाठीच्या समितीच्या अध्यक्षपदी निवड केली. या समितीने आपला प्रस्ताव देखिल आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटनेकडे पाठविला आहे. त्यात त्यांनी डबल ट्रॅप ऐजवी मिश्र लढती आयोजित करावी अशी सुचना मांडली आहे. क्रिडा जगातील सर्वोच्च अशा ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजी या खेळात भारताला वैयक्तिक प्रकारात सुवर्ण पदक मिळवून देणारा तर रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक हे काही दशांश गुणांनी हुकलेला अभिनव बिंद्रा याची आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटनेने खेळाडूंसाठीच्या समितीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे.
नेमबाजांनी नाराजीचा केला सूर व्यक्त
नेमबाजी या खेळातील योगदान पाहून खेळाच्या दृष्टीने खेळात काय बदल आवश्यक आहे. याचा आढावा अभिनव बिंद्रा याच्या नेतृत्वाखाली समितीने घेतला आहे. यानुसार पुरूषांच्या डबल ट्रॅप प्रकाराऐवजी मिश्र लढत आयोजित करावी. पुरूषांच्या 50 मीटर प्रोन प्रकाराच्या लढतीचे रूपांतरही मिश्र प्रकारात करावे. असा प्रस्ताव मांडला आहे. पुरुषांच्या 50 मीटर पिस्तूल प्रकाराच्या लढतीही एअर पिस्तूलमध्ये मिश्र प्रकारात घेण्यात याव्यात, अशी सूचना समितीने केली आहे. मिश्र स्वरूपामुळे महिला नेमबाजांनी सूचनांचे स्वागत केले आहे. मात्र भारतीय पुरुष नेमबाज चांगली कामगिरी करत असलेल्या 50 मीटर पिस्तूल प्रकार संपूर्णत: बदलण्याच्या सूचनेमुळे पुरुष नेमबाजांनी नाराजीचा सूर व्यक्त केला आहे.