नेरळ जिल्हा परिषद शाळेची चौकशी सुरू

0

कर्जत । कर्जत तालुक्यातील नेरळ येथील बहुचर्चित ठरलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या दीड वर्षापूर्वी पाडलेल्या शाळेच्या चौकशीला अखेर सुरुवात झाली. या चौकशी कामी जिल्हा परिषदेचे शिष्टमंडळ बुधवारी नेरळमध्ये दाखल झाले होते. व नेरळ जिल्हा परिषद शाळेत 8 नोव्हेंबर रोजी 3 तास चौकशी सुरु होती. यावेळी जिल्हा परिषदेच्या शिष्टमंडळात शिक्षणाधिकारी शेषराव बडे, गटशिक्षणाधिकारी एस.बी. डंबाये, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कर्जतचे उप अभियंता एस. के केदारे यांनी जिल्हा परिषद शाळेत येऊन चौकशी सुरू केली.

या चौकशी समितीने शाळेच्या मुख्याध्यापिका यांची आणि शाळेत उपलब्ध दास्तऐवजांची चौकशी केल्याचे समजते. या बाबतीत शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी चौकशीचे काम सुरु आहे, त्यासंदर्भात विचारले असता त्यांनी बोलण्याचे टाळले. त्यामुळे या गूढरीत्या सुरु असलेल्या चौकशीचे फलीतात रुपांतर होणार का? असा प्रश्‍न सर्वांना पडला आहे.