नेरळ-दहिवली पुलावरील संरक्षक रेलिंगची रंगरंगोटी

0

कर्जत । नेरळ-कळंब जिल्हा मार्गावरील दहिवली पुलावरील एका साईडच्या संरक्षक रेलिंगची बांधकाम विभागाकडून रंगरंगोटी सुरू आहे. परंतू दुसर्‍या भागाकडील रेलिंग दोन वर्षांपासनू तुटून मोडकलीस आल्या आहेत. याकडे दुर्लक्ष करून बांधकाम विभागाने रंगरंगोटी सुरू केली आहे. या पुलावरून प्रवास करणे धोक्याचे झाले असताना मात्र रेलिंग चांगल्या करण्याऐवजी रंगरंगोटी करण्याचीच घाई बांधकाम विभागाला झाली असल्याचे दिसत आहे. दहिवली पुल हे कमी उंचीचे असल्याने पावसाळयात दरवर्षी पुलावरून पावसाचे पाणी जाते. आणि पावसाच्या प्रवाहात रेलिंग तुटून नादुरूस्त होतात. परंतू बांधकाम विभागाकडून वेळीच यांची दुरूस्ती केली जात नाही.

या पुलावरून मोठया प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे अशा ठिकाणी अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. असे असताना मात्र बांधकाम विभाग याकडे डोळे झाक करत आहेत.