नेरळ रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंगमुळे प्रवाशी त्रस्त

0

कर्जत : नेरळ शहरात वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला असून नेरळ बस स्थानकपासून पुढे नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरून जाणार्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुचाकी अनधिकृतपणे पार्क केल्या जातात. आणि त्यामुळे रेल्वे स्टेशनकडे आणि बाजारपेठेत ये-जा करणार्‍या प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. परंतु याकडे नेरळ वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नेरळ शहरात मोठ्या प्रमाणात वसाहती वाढत असलंयाने नेरळ शहराची लोकसंख्याही देवसेंदिवास वाढत आहे. आणि त्यामुळे साहजिकच त्याचा परिमाण वाहतुकीवर होत आहे. दुचाकी धारक रस्त्यावर दुचाकी पार्क करत असल्याने अनेक वेळा वाहतूक कोंडीही होते.

भर रस्त्यावर दुचाकी, किंवा चार चाकी पार्क केली असताना मात्र पोलीस अशा वाहन चालकांवर कारवाई का करत नाहीत असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. यामुळे नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राकडे येणार्‍या रुग्णांनाही मनस्ताप यामुळे सहन करावा लागतो, तरी स्थानीक ग्रामपंचायत आणि वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देऊन अशा अनधिकृत पार्क केलेल्या दुचाकीधारकांवर कारवाई करावी व हा रस्ता मोकळा करावा अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे.

नेरळ बस स्थानक ते रेल्वे स्टेशन परिसरात ज्या दुचाकी पार्क केल्या जातात त्यावर स्थानिक ग्रामपंचायतीनेही लक्ष देणे गरजेचे आहे. आमच्याकडून अशा अनधिकृत दुचाकी धारकांवर त्वरित कारवाई केली जाईल व रस्ता मोकळा केला जाईल.
– मदन पाटील
वाहतूक पोलीस, नेरळ