नेरी दिगरच्या कोरोना संशयित तरूणाचा मृत्यू

0

जामनेर – तालुक्यातील नेरी दिगर येथील एका ३० वर्षीय तरूणाचा आज दुपारी १२ वाजता जिल्हा रूग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली. दरम्यान या तरूणाचा अहवाल अद्याप आला नसल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही.
जामनेर तालुक्यातील नेरी दिगर येथील ३० वर्षीय तरूणास कोरोना संशयित म्हणून दि. २३ रोजी कोरोना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्याचा उपचारादरम्यान दुपारी १२ वा. मृत्यू झाला. या तरूणाच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असुन त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. अहवाल आल्यानंतरच या तरूणाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. त्यामुळे जामनेर तालुक्याच्यादृष्टीने ही धक्कादायक बाब आहे.