जळगाव । शहरातील नेरी नाक्याजवळील पेट्रोल पंपासमोर दोन दुचाक्या समोरा-समोर धडकल्याची घटना रविवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. अपघातात मात्र एका दुचाकीस्वाराच्या हाताला किरकोळ दुखापत झाली होती.
रविवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास पांझरापोळकडून तरूण त्यांच्या दुचाकीवरून नेरीनाक्याकडे पेट्रोल भरण्यासाठी येत होता. त्याच दरम्यान, स्मशानभुमीकडून शहराकडे दुसरा तरूण दुचाकीवरून जात होता. मात्र, नेरीनाक्याजवळील वळणावरच दोन्ही दुचाक्या समोरा-समोर धडकल्या गेल्या आणि दोन्ही दुचाकीस्वार फेकले गेले. दुचाकींचे किरकोळ नुकसान झाले परंतू एकाच्या हाताला जोरदार मार बसला. अपघात झाल्याचे कळताच चौकात ड्युटी बजवत असलेल्या वाहतुक कर्मचार्यांनी त्या ठिकाणी धाव घेत दोन्ही दुचाकीस्वारांना उचलून बाजूला बसविले.