नेरुळ येथे रविवारी हिंदू धर्मजागृती सभा

0

नवी मुंबई । हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणे, यात्रांवरील कर आदींचे प्रमाण वाढत आहे, गोमातेची हत्या राजरोसपणे होत आहे, विस्थापित काश्मिरी हिंदूंचे अद्यापही पुनर्वसन झालेले नाही, हिंदूंची धर्मांतरे थांबत नाहीत, ‘लव्ह-जिहाद’च्या माध्यमातून हिंदू युवती पळवल्या जात आहेत! हे असेच चालू राहणार असेल, तर हिंदूंना त्यांच्या हक्काचे ‘हिंदू राष्ट्र’ जोरकसपणे मागावेच लागेल. हे राष्ट्र कसे साकार करायचे, हे समजून घेण्यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जाहीर ‘हिंदू धर्मजागृती सभे’चे आयोजन केले आहे.

गावदेवी मंदिर, तेरणा महाविद्यालयाजवळ, सेक्टर 12, नेरूळ (प.) येथे रविवार,दि. 26 नोव्हेंबर 2017 या दिवशी सायंकाळी 5.30 वाजता हिंदू धर्मजागृती सभेचे आयोजन केले आले आहे. हिंदू जनजागृती समिती गेल्या 15 वर्षांपासून राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी अखंड कार्यरत असून आजवर समितीच्या वतीने देशभरात हजारो सभांचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या सभेमध्ये ‘हिंदू राष्ट्राची आवश्यकता’, या ज्वलंत विषयावर प्रखर हिंदुत्वनिष्ठांंचे मार्गदर्शन असणार आहे तसेच ‘शौर्यजागरण आणि स्वसंरक्षण यांची आवश्यकता’ आणि ‘सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या निर्मूलनाची आवश्यकता’ या विषयावर वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. समस्त हिंदूंनी या ‘हिंदू धर्मजागृती सभे’ला उपस्थिती राहावे आणि आपले धर्मकर्तव्य बजावावे, असे आवाहन समितीने केले आहे.