नेरूळमध्ये अमरनाथ हल्ल्याचा निषेध

0

नेरूळ : अमरनाथ येथे भविकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांना रविवारी नेरुळ रेल्वे स्थानकात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी पाकिस्तान विरोधात घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली. या प्रसंगी नीलकंठ बिजेलगावकर, सुरज सिंह, धना शेवाळे, प्रशांत सोळसकर, मनोज गाजरे तसेच संघटनांचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.