नेर येथे स्वाभिमानी संघटनेतर्फे रास्ता रोको

0

धुळे । तालुक्यातील नेर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वतीने रविवारी 4 रोजी सकाळी 9 वा. सूरत-नागपूर महामार्गावरील लोणखेडी फाट्याजवळ रास्ता-रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे सूरत – नागपूर महामार्गावरील वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी शेतकर्‍यांकडून घोषणाबाजी करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यां ब कमिटीच्या बैठकीत काही मागण्या मान्य असल्याचे सांगत त्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. परंतु, लेखी हमी न देता केवळ आश्वासन दिल्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली. सरकारच्या या ध्येय धोरणाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लोणखेडी फाट्याजवळशनिवारी पुतळा दहनही केले होते. त्यानंतर पुन्हा रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष जगदिश पाटील, उपाध्यक्ष गोंधळ खिवसरा, बाळू सोनवणे, धुळे तालुकाध्यक्ष शिवाजी देशमुख, शांताराम पाटील आदी उपस्थित होते.