नेवे यांची दक्षता समितीवर निवड

0

भुसावळ । येथील गडकरी नगराच्या रहिवासी सामाजिक कार्यकर्त्या अंजली प्रशांत नेवे यांची शहर दक्षता समिती अशासकीय सदस्य म्हणून नुकतीच निवड झाली आहे. यामुळे परिसरातील नागरिक व हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांचे निवडीबद्दल माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, आमदार संजय सावकारे, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रा. डॉ. सुनिल नेवे, भाजपा शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे यांनी त्यांचे अभिनंदन केले.