न्यूर्यार्क । अमेरिकन नौसेनेची ’नेव्ही सील’ हे जगातील सर्वाधिक खतरनाक सैनिकांचे लढाऊ पथक म्हणून ओळखले जाते. अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच नौसेनेच्या या लढाऊ पथकात 2 महिला सैनिकांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे अत्यंत धोकादायक व अत्यंत कठीण अशा मोहिमेत या 2 महिलांना सहभाग घेता येणार आहे. नेव्ही सीलच्या सैनिकांनीच ओसाम बिन लादेनच्या खातमा केला होता. त्यामुळे जगात या सैनिकांच्या कामगिरीचा दबदबा आहे.
नेव्ही सीलेमध्ये दाखल होण्यापूर्वी एक महिला सैनिक ही इतर सक्षम नौसेनेच्या अधिकार्यांना येत्या उन्हाळ्यात प्रशिक्षित करणार आहे. तिच्या अचूक आणि प्रभावी कामामुळे ती प्रथम ’नेव्ही सील’ अधिकारी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुसरी महिला सैनिक ही ’स्पेशल वॉरफेअर कॉम्बॅटंट क्राफ्ट क्रीवमॅन’च्या मोहिमेसाठी प्रशिक्षित होणार आहे.