जेसीबीद्वारे ड्रेनेज लाईनची खोदाई सूरू असताना पाईपलाईन फुटली
पिंपरी चिंचवड ः महापालिकेच्या वतीने नेहरुनगर परिसरात ड्रेनेज लाईनची कामे करण्यात येत आहेत. त्या कामासाठी खोदाई करताना एमएनजीएल कंपनी पाईपची लीक होवून गळती सुरु झाली. त्यानंतर अग्नीशामक विभागाच्या खबरदारीमुळे गळती रोखण्यात यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. त्यामुळे काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. पिंपरी चिंचवड शहरभर महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीचा विस्तार करण्यात आलेला आहे. शहरातील अनेक भागात ग्राहक जोडल्याने सर्वत्र गॅसचा पुरवठा करणार्या पाईपलाईन टाकण्यात आलेल्या आहेत.
अग्नीशमन दल तात्काळ दाखल…
महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागात ड्रेनेजचे काम सुरु आहे. नेहरुनगर परिसरात ड्रेनेज लाईनची जेसीबीद्वारे खोदाई सुरु असताना महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीच्या पाईपलाईन फुटून गॅस गळती सुरु झाली. त्यावेळी पालिकेच्या अग्नीशामक विभागाला पाचारण करुन पाण्याचा फवारा करण्यात आला. तसेच कंपनीच्या संबंधित सुरक्षा अधिकारी व कर्मचार्यांना संपर्क साधून तात्काळ बोलविण्यात आले. त्यांनी गॅस गळती झालेल्या पाईपचा जॅमर बसवून गॅस गळती तात्काळ थांबविण्यात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.