जळगाव । येथील नेहरु चौक बहुउद्देशीय मित्र मंडळातर्फे सामाजिक उत्तरदायित्वाचा भावनेतून या सामाजिक उपक्रमात शेतकर्यांना शुभेच्छा देऊन बैलांसाठी पोळ्याचा साज वाटपाचा कार्यक्रम सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी व प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर व आमदार राजूमामा भोळे तसेच मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी यांच्या हस्ते झाले.
51 शेतकर्यांना साज वाटप
तालुक्यातील विविध खेडेगावातून 51 शेतकरीबांधवांना आमंत्रित करुन साज भेट म्हणून देण्यात आला. त्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून गेले 15 दिवस परिश्रम करण्यात आले. प्रकल्प प्रमुख ललित आमोदकर, महेश ठाकूर, पियुष गांधी, कुणाल ठाकूर, रोहित शिरसाठ, धनंजय आमोदकर होते.