पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी उद्घाटन केलेले सरकार सरोवर धरण हे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे स्वप्न होते. आपल्या देशाच्या विकासाचा पाया घालणार्?या नेहरू यांनी 1961 साली या धरणाचा पायाभरणी समारंभ केला होता पण या कामात अनेक अडथळे आणण्यात आले. त्यामुळे त्याला अधुनमधुन दीर्घकाळची स्थगिती मिळत गेली आणि शेवटी पायाभरणी समारंभानंतर 56 वर्षांनी त्याचे उदघाटन झाले आहे. हे जगातले दुसर्?या क्रमांकाचे धरण आहे. पहिला क्रमांक असणारे अमेरिकेतले काऊली डॅम हे धरण हे 1940 च्या दशकात बांधण्यात आले. कोणत्याही विकास कामाला अडथळे आणणारे विघ्न संतोषी लोक हे केवळ भारतातच आहेत असे नाही तर ते अमेरिकेतही आहेत. अमेरिकेतल्या या धरणालाही अनेक आक्षेप घेण्यात आले. पण तरीही ते 20 वर्षात बांधून झाले. अर्थात ते बांधण्यात यावे ही पहिली कल्पना त्या आधी 50 वर्षे पुढे आली होती. पण त्यावर एवढा मोठा काळ वाद आणि विवाद होत राहिले.
सरदार सरोवर प्रकल्पालाही अनेक प्रकारचे आक्षेप घेण्यात आले. ते भूकंपगˆस्त प्रदेशात आहे, त्याच्या जल साठ्यामुळे भूकंपाचा धोका वाढेल असे आक्षेप घेण्यात आले. पण तज्ज्ञांनी या आक्षेपांचे निरसन केले. नंतर धरणगˆस्तांच्या पुनर्वसनाचे प्रश्न मांडण्यात आले पण आधी पुनर्वसन आणि नंतर धरण असा क्रम सरकारने ठरवला आणि हीही अडचण दूर झाली. अर्थात या बाबतीत अजूनही आंदोलने करण्यात येेतात. या सगळ्या अडचणी दूर झाल्या तरीही मुळात एवढ्या मोठ्या धरणाची आवश्यकताच नाही असे मत मांडून जनतेच्या मनात अनेक गैरसमज निर्माण करण्यात आले. यापेक्षा छोटे छोटे प्रकल्प उभारणे किती सोयिस्कर आहे याचाही कथित अभ्यास पुढे करण्यात आला. पण तेही अभ्यास बिनबुडाचे आहेत हे सिद्ध झाले. मुळात भारतात असे मोठे प्रकल्प झाले तर भारतात शेती छान पिकेल आणि भारताचे धान्य जगभरात जाईल या भीतीने गˆासलेल्या काही देशांनी भारतातल्या या धरणाल विरोध करणारांना फूस दिली. आपल्या देशात चार प्रकारचे लोक प्रगतीचे शत्रू ठरले आहेत. ते कोणत्याही विकास प्रकल्पाला विरोध करतात पण आव आणतात तो मात्र कोणाच्या तरी कैवाराचा किंवा कशाच्या तरी रक्षणाचा. मानवाधिकारवादी, स्वदेशीवादी, पर्यावरणवादी आणि भगवे कफनीधारी. यातल्या पर्यावरणवादी लोकांनीही सरदार सरोवर प्रकल्पाला मागे खेचण्याचे श्रेय मिळवलेच. 56 वर्षांच्या विलंबात त्यांचाही वाटा आहे.
वीज निर्मिती, पेयजल आणि शेती या तीन क्षेत्रात मोटी क्रांती करण्याची क्षमता अशा प्रकल्पात आहे. शिवाय पर्यटन, मच्छिमारी, प्रक्रिया उद्योग अशा कितीतरी अनुषंगिक क्षेत्रात या प्रकल्पाचा मोठा वाटा असणार आहे. त्यामुळे भारताच्या प्रगतीवर जळणार्?या काही शक्तीचा जळफळाट होणे साहजिक आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली की न्यायालयानेही कामाला स्थगिती द्यावी असे अनेकदा घडले. आपल्या देशाला प्रगती करायची असेल तर विकास कामांच्या मागे सर्वांनी एकमुखाने उभे राहिले पाहिजे पण तसे होत नाही आणि आपली पावले म्हणावी त्या गतीने पुढे पडत नाहीत.आज जगातले दुसर्?या क्रमांकाचे हे धरण किती अडथळे सहन करीत तयार झाले आहे हे आपण पहातच आहोत पण हेच काम आपण एकदिलाने केले असते तर ते उशिरात उशिरा 1970 च्या दशकात पूर्ण झाले असते आणि आतापर्यंत किती तरी धान्योत्पादन वाढले असते. पण तसे होऊ च द्यायचे नाही असे काही लोकांनी ठरवले आहे. या लोकांनी घेतलेले आक्षेप बिनबुडाचे होते म्हणून शेवटी न्यायालयाने कामाला अनुमती दिली पण अडचणी आणणारे लोक कामात विघ्न आणण्यात काही काळ तरी यशस्वी झाले. या प्रकल्पामुळे 9 हजार गावांना पिण्याचे पाणी मिळणार आहे आणि 18 लाख 50 हजार हेक्टर (46 लाख 25 हजार एकर) जमिनीला पाणी मिळणार आहे ही गोष्ट काही सामान्य नाही.
-जयवंत हाबळे
वरिष्ठ उपसंपादक जनशक्ति, मुंबई
8691929797