नेहरू नगर कब्रस्थानातील दोन घरांना आग

0

जळगाव – शहरातील शिरसोली रस्त्यावर असलेल्या नेहरू नगर मुस्लीम कब्रस्थानमधील एका खोलीत ठेवलेल्या कापसाला व प्लॅस्किला शॉर्टसक्रिटमुळे आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी दुपारी १२ वाजता घडली. या आगीत संपूर्ण कापुस जळून खाक झाला असून पाच अग्निशमन बंबांच्या मदतीने आग विझविण्यात यश आले आहे. या आगीत ८० हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज वर्तविण्या तआला आहे.

5 अग्नीशमन बंबांनी विझविली आग
नेहरू नगर, शिरसोली, आझादनगर परिसरात राहणा-या मुस्लीम नागरिकांचे कब्रस्थान नेहरू नगरात आहे. या ठिकाणी अमजद अहमद पिंजारी हा वॉचमन म्हणून कामाला आहे़ सोबतच हा कापुस व प्लॅस्टिकच्या सहाय्याने दोरी बनविण्याचे काम सुध्दा करतो. त्यामुळे त्याने कब्रस्तानातील एका खोलीत कापुस व प्लॅस्टिक ठेवले होते़ दरम्यान, मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास खोलीवरून गेलेल्या विद्युत वाहिणींमध्ये अचानक स्पार्किंग झाली़ त्याच्या ठिणग्या कापसाला पडल्यानंतर आगीला सुरूवात झाली. कब्रस्तानाच्या समोर असलेल्या टपरीचालकाला हा प्रकार समझताच त्याने संबंधित व्यक्ती व अग्निशमन विभागाला कळविले.

80 हजार रूपयांचे नुकसान
अग्निशमन बंब काही मिनिटाच घटनास्थळी दाखल झाल्यानंतर कर्मचारी यांनी कापसावर पाण्याचा मारा करण्यात आला. आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे आणखी चार अग्निशमन बंब बोलविण्यात येऊन आग नियंत्रणात आणण्यात आली. दरम्यान, संपूर्ण परिसरात धूर पसरला होता. अखेर दुपारी 3 वाजेच्या सुमारास संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. तसेच घटनास्थळी नगरसेवक प्रशांत नाईक हे देखील उपस्थित झाले होते. त्यांनी आगीबाबत पोलिसांना कळविल्यानंतर एमआयडीसी पोलिसही आगीच्या ठिकाणी दाखल झाले होते. दरम्यान, संपूर्ण आगीत कापुस जळून खाक झाला तर काही प्लॅस्टिक सुध्दा जळाले़ यात संपूर्ण ८० हजार रूपयांचे नुकसान झाले असल्याचे काहींनी म्हणणे होते़