नैतिक शिक्षणासाठी अभ्यासक्रमात भगवतगीता अनिवार्य असावी

0

नवी दिल्ली : भाजपाचे खासदार रमेश बिधूरी यांनी शाळांसह शैक्षणीक संस्थामध्ये नैतिक शिक्षणासाठी अभ्यासक्रमात भगवतगीता शिकवणे अनिवार्य करावे, अशा मागणीचे खासगी विधेयक लोकसभेत मांडले आहे.

रमेश बिधूरी यांनी म्हटले आहे की, देशात गुन्हेगारी, अनैतिक कृत्य असे अनेक वाईट प्रकार दिसून येत आहेत. याची अनेक कारणे आहेत. पण, सर्वात महत्वाचे कारण म्हणजे शिक्षण व्यवस्थेत काही कमतरता आहेत. शिक्षण व्यवस्थेत शालेयस्तरावरच नैतिकतेचे धडे देण्यावर भर दिला पाहिजे. भगवतगीता निश्‍चितपणे नैतिकतेचे शिक्षण देते आणि योग्य मार्ग दाखवते. सर्वच धर्मात नैतिकतेवर भर दिला आहे. भारताचा पाया मजबूत करायचा असेल तर मुलांमध्ये नैतिकता वाढविणे गरजेचे आहे. आमचे म्हणणे आहे की, तिसरीच्या वर्गापासूनच नैतिकतेचा हा धडा शिकवला गेला पाहिजे.

बिधूरी यांनी 10 मार्चला मशैक्षणिक संस्थांमध्ये नैतिक शिक्षण भगवतगीतेच्या स्वरूपात अभ्यासक्रमात अनिवार्य विधेयक 2016फ हे खासगी विधेयक मांडले होते. ज्यामध्ये भगवतगीता अभ्यासक्रमात अनिवार्य असावी, असे म्हटले आहे.