नैराशातून राहत्या घरात तरुणाची आत्महत्या

0

शहादा । शहरातील भवानी चौकामध्ये एका युवकाने आपल्या रहात्या घरात 23 ऑगस्टच्या मध्यरात्री गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दिपक वसंत कोळी (वय 21) हा काही कारणास्तव वैफल्यग्रस्त होता. दिपक यास मानसिक तणाव असल्याचे सांगण्यात आले पण आत्महत्येचे कारण नेमके समजु शकले नाही.

उशीरा रात्री त्याने घरातील मागच्या बाजुस असलेल्या लोखंडी पाईपला दोरीने गळफास घेतला. सकाळी तो लटकलेल्या स्थितीत त्याच्या आईला दिसला . शरद बुधा कोळी याने दिलेल्या खबरीवरुन शहादा पोलिसात अकस्मात मृत्यु नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांचा मार्गदर्शनाखाली सुरु आहे.