शिरपूर । नैराश्यावर मात करण्यासाठी चांगल्या सवयी व छंद असणे उपयोगाचे आहे, असे प्रतिपादन श्रीमती एच.आर. पटेल महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शारदा शितोळे यांनी केले. येथील आर.सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय व उमविच्या विद्यार्थी कल्याण विभाग यांच्या संयुंक्त विद्यमाने ‘युवतीसभा’ अंतर्गत व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा नुकतीच पार पडली. याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यशाळेचे उद्घाटन आर.सी.पटेल आय.एम.आर.डी कॉलेजच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे.बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. पी.जे. देवरे, विभाग प्रमुख प्रा. सुहास शुक्ल, प्रा. निलेश साळुंखे, प्रा. नितीन पाटील, प्रा. व्हि.एस. पाटील, प्रा. डी.आर. पाटील, प्रा. जि.व्ही. तपकिरे आदी उपस्थित होते.
व्यक्तीमत्व विकासावर मार्गदर्शन
पुढे बोलतांना प्राचार्या शितोळे यांनी व्यक्तिमत्व विकास संभाषण कौशल्य, बौद्धिक चाचणी तसेच व्यक्तिमत्व विकासातून यशस्वीजीवनाची वाटचाल कशी करावी या संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी वर्तणूक, सवयी, चारीत्र्य यांचा यशस्वीपणे उत्कर्ष घडवून योग्य रित्या व्यक्तिमत्व विकासात उपयोग कसा करून घ्यावा या विषयीचे मत वेगवेगळी उदाहरणे देऊन स्पष्ट केले. तसेच प्रत्येक व्यक्ती ही दगडासारखी असून त्यात एक शिल्प दडलेले असते आणि ते शिल्प घडवणे म्हणजेच व्यक्तिमत्व विकास होय, असेही त्या म्हणाल्या.
विद्यार्थीनींची गटनिहाय विभागणी
द्वितीय सत्रात महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील यांनी, एकूण 10-10 विद्यार्थिनीचे गट केले व त्यांना व्यक्तिमत्व विकासाठी काय पहिजे ते एका कागदावर लिहायला सांगितले तसेच आजच्या युगात नोकरी साठी कोणते गुण आवश्यक आहेत ते सुद्धा नमूद करण्यास सांगितले. तसेच प्रत्येकी एका विद्यार्थिनीला या सर्व मुद्द्यांवर बोलण्यास सांगितले. शेवटी त्यातून त्यांनी काही महत्वाचे मुद्दे उदाहरणासहीत स्पष्ट केले. या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील तसेच परिसरातील इतर महाविद्यालयांच्या विद्यार्थिनींनी उस्फूर्त संख्येने सहभाग नोंदविला.
विद्यार्थीनींचे केले कौतुक
युवतीसभेअंतर्गत पार पडलेल्या या कार्यशाळेचे संयोजन महाविद्यालयाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे प्रमुख प्रा. विजय सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. अमृता भंडारी, प्रा. स्मितल पाटील यांनी सुत्रसंचालन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. पी.जे.देवरे विभाग प्रमुख प्रा.सुहास शुक्ल, प्रा. निलेश साळुंखे, प्रा. नितीन पाटील, प्रा. व्हि. एस. पाटील, प्रा. डी. आर. पाटील, प्रा.जि.व्ही.तपकिरे, रजिस्ट्रार श्री प्रशांत महाजन, टी.पी. प्रमुख प्रा. मिल्केश जैन यांनी या बहुउद्दिष्टीत कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थीनींचे कौतुक केले.