नैराश्रातून स्वत:ला पेटविले

0

जळगाव । व्यवसायात अपयश आणि अविवाहितपणामुळे घरात चिडचिड व भांडण करणे या सर्व नैराश्येतून पिंप्राळा परीसरात राहणार्‍या 38 वर्षीय तरूणाने स्वतःच्या हाताने पेट्रोल टाकून पेटवून घेतल्याचा प्रकार आज सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील गुजराल पेट्रोल पंपासमोरील असलेल्या आदर्श हॉटेल जवळ घटना घडली असून त्याला उपचारार्थ जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून घरात चिडचिड व रागीट स्वभाव असल्याने तो घरात जास्त कुणाशी बोलत नव्हता. एकाकीपणामुळे त्यांने हे पाऊल उचचल्याचे बोलले जात होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात धाव घेतली.

व्यवसायात आले अपयश
हेमंत हा देश, विदेशात साखर, कापूस व कांदा आदी पिके समुद्रामार्गे निर्यात करायचा. काही दिवस हा व्यवसाय सुरळीत चालला. त्यानंतर त्यात अपयश आले. तीन महिन्यापासून तो तणावात राहत होता. वडील प्रभाकर गोपनारायण हे दूरसंचार विभागात नोकरीला होते. ते सेवानिवृत्त झाले आहेत. हेमंत हा मोठा आहे. मधला भाऊ प्रशांत हा घरीच असतो तर सर्वात लहान निलेश हा बडोदा येथे कंपनीत नोकरीला असल्याची माहिती घराच्या शेजारी राहणार्‍या रहिवाश्यांनी सांगितले.

बाटलीत पाणी घेवून जात असल्याचा समज
प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेली माहिती नुसार, हेमंत प्रभाकर गोपनारायण (वय 38, रा.श्रीरत्न कॉलनी, पिंप्राळा परिसर) हा तरूण गेल्या दहा दिवसांपासून जेवन न करता कोणाशीही बोलत नव्हता. सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता हेमंतने घरातून पाण्याच्या बाटलीत रॉकेल टाकून घराबाहेर पडला. त्यावेळी आई चित्रा आणि वडील प्रभाकर गोपनारायण यांनी देखील बघितले. त्यांना वाटले की बाटलीत मित्रांसाठी पिण्याचे पाणी घेवून जात असावा असा समाज करून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यावेळी हेमंतचे आईवडील घरात जेवण करत होते. बाहेर पडल्याच्या पाच मिनिटानंतर बाहेर मुलगा जळत असल्याची माहिती मिळाली. हेमंतने घराच्या परिसरातच मोकळ्या पटांगणात स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटविले.

यांनी विझविली आग
रस्त्यावर तरुण जळत असल्याचे लक्षात आल्यानंतर शहर वाहतूक शाखेचे शिवाजी माळी, सुनील निकम, संजय पाटील, मनोरे यांच्यासह रहिवाशी शक्ती महाजन, स्वप्नील नेमाडे, राहूल पाटील, किरण माहूरे व विक्की देवराज या तरुणांनी धाव घेऊन घरातील गोधळी तसेच वाळू टाकून हेमंत याला विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मालवाहू रिक्षातून त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेत हेमंत हा 81 टक्के जळाल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.सुपे यांनी दिली.