शहादा। नैसर्गिक आपत्तीकरिता एक लाख कोटी रुपयाचा निधी उभारावा म्हणुन येत्या 26 जुलै रोजी शहरासह तालुक्यात भा. क.पा. तर्फे रस्तारोको आंदोलन केले जाणार आहे. बैठकीला जिल्हा सचिव माणक सुर्यवंशी, मोहन शेवाळे, ईश्वर पाटील ,सिताराम माळी, बेबी न्हावी, राजु गिरासे, माजी उपसभापती द्वारकाबाइ गांगुर्डे, माजी प. स. सदस्य दंगल सोनवणे ,धर्मा पवार ,विजय तिरमले उपस्थित होते.
बैठकीत शेतकरी शेतमजुर कारागीर यांना किमान तिन हजार रुपये निवृत्तीवेतन द्यावे, सारंगखेडा व प्रकाशा बॅरेज दरा सुसरी धरणाचे पाणी शेतापर्यंत पोहचवणे या विषयावर चर्चा केली. ईश्वर पाटील, मोहन शेवाळे, माणक सुर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व सुत्रसंचालन ईश्वर पाटील यांनी केले. 26 जुलै रोजी शहादा पेट्रोलपंप प्रकाशा, म्हसावद व सारंगखेडा येथे रस्ता रोको आंदोलन केले जाणार आहे.