राष्ट्रवादीकडून मेगाभरतीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका
मुंबई-नोकरभरतीबाबत जर नोटिफिकेशनच निघाले नाही तर स्थगिती कशी दिली. लोकांची दिशाभूल करत मी स्थगिती दिली आहे असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. हा नवा प्रश्न मुख्यमंत्र्यांनीच आता निर्माण केला असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुख्यमंत्र्यांवर करण्यात आली आहे. घोषणा करणे आणि त्या घोषणांना स्थगिती देणे हीच भूमिका मुख्यमंत्र्यांची सातत्याने राहिली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. मराठा आरक्षण नोव्हेंबरमध्ये लागू करण्याचे संकेत देतानाच ७२ हजार नोकरभरतीला स्थगिती दिल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. यावर प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप केला आहे.
सातत्याने भरती प्रक्रिया हवी
सरकारने भरतीवर बंदी टाकली होती. तो निर्णय कुठेतरी गैर होता हे आता निश्चित होत आहे. सर्वच खात्यामध्ये सातत्याने कर्मचारी निवृत्त होत आहेत. त्यामुळे सातत्याने भरती प्रक्रिया सुरु राहिली पाहिजे. मात्र मोठा आकडा निर्माण करुन नंतर मेगाभरती करु ही सरकारची भूमिका चुकीची आहे असेही नवाब मलिक म्हणाले. शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांची कमतरता आहे. त्याचा परिणाम कामावर दिसत आहेत. कर्मचाऱ्यांची भूमिका आहे की, तुम्ही नोकरभरती केली पाहिजे. सातवा वेतन आयोग असेल किंवा कामाचा ताण असेल त्यामुळे निश्चितरुपाने कर्मचारी,अधिकाऱ्यांवर त्याचा परिणाम होत असतो. तो ताण कमी करण्याची जबाबदारी सरकारची आणि मुख्यमंत्र्यांची असते. त्यामुळे कर्मचारी,अधिकारी यांचे समाधान होईल अशी भूमिका सरकारने घेतली पाहिजे आणि नोकरभरतीबाबत जर नोटिफिकेशनच निघाले नाही तर स्थगिती कशी दिली. लोकांची दिशाभूल करत मी स्थगिती दिली आहे असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. हा नवा प्रश्न मुख्यमंत्र्यांनीच आता निर्माण केला आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
हे देखील वाचा
दुरदर्शनच्या माध्यमातून सरकार चालत नाही
मुख्यमंत्र्यांनी दुरदर्शनच्या माध्यमातून सरकारची भूमिका लोकांच्यासमोर मांडली. दुरदर्शनच्या माध्यमातून सरकार चालवता येत नाही. मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबरअखेर मराठा आरक्षण कायदेशीर देण्याचे जाहीर केले आहे. सरकार कालबध्द कार्यक्रम जाहीर करत आहेत परंतु त्यांनी गेल्या चार वर्षात हा कार्यक्रम जाहीर केला असता तर ही वेळ त्यांच्यावर आली नसती अशी टिका नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. मराठा आरक्षण नोव्हेंबरअखेर देण्याचे मुख्यमंत्र्यांनी दुरदर्शनच्या माध्यमातून जाहीर केले. त्यांच्या या भूमिकेवर नवाब मलिक यांनी टिका करतानाच मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत याअगोदर लोकांशी संवाद साधायला हवा होता. तसा संवाद न साधता ते टेलिव्हिजनच्या माध्यमातून संवाद साधत असल्याबाबतचा आक्षेप मलिक यांनी घेतला.
मराठा आरक्षणाबाबत संवाद साधला पाहिजे हे आम्ही सुरुवातीपासून सांगत आलो आहोत. मात्र मुख्यमंत्र्यांनी इतके दिवस आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला नाही. आज सांगत आहेत की, ते संवाद साधायला तयार नाहीत. त्यांच्याकडे या आंदोलनात पुढाकार घेणारे नेते त्यांच्या पक्षात आहेत. त्या लोकांना त्यांनी खासदार केले आहे. त्यांच्या मंचावर ते लोक दिसले. संभाजीराजेंना का देत नाही, नारायण राणेंना खासदार केले त्यांना का नेमत नाही. संवाद सुरु करण्याचे प्रयत्न का करत नाही नुसतं टेलिव्हिजनवरुन बोलून दाखवत आहेत अशी टिकाही नवाब मलिक यांनी केली.